Saturday, January 31, 2009

PaParazzi D Shooter...

नमस्कार !!!
मी विश्वास नायडू. माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. पारदर्शक.. पण त्याआधी माझ्याबद्दल थोड़े जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. मी मूलचा लोनावाल्याचा. काही वर्षापूर्वी मी पुण्यात स्थायीक झालो. तरी २२ वर्षे झाली. आधीचे शिक्षण वाणिज्य शाखेतुन झाले. मग आवड म्हणुन फर्गुसन महाविद्यालयातून LANDSCAPING DIPLOMA पूर्ण  केला. त्यानंतर HORTICULTURE मधे डिग्री घेतली. आता सध्या मी एम्. एस. करतो आहे. माझ्या नावाच्या आधी मला  Dr. हवे आहे. असो. 
माझा व्यवसाय LANDSCAPING चा आहे. IT SECTOR मधे शोभेची झाडे सुशोभानासठी भाड़े तत्वावर देतो. शिवाय LANDSCAPING ची कामेसुद्धा सुरु असतातच. 
मला PHOTOGRAPHYCHA छंद  जडला आहे. निरनिराल्या विषयावर मी PHOTOZ काढले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. PHOTOGRAPHY मुले मी खुप हिंडत असतो. ट्रेकिंग सुधा करतो. मला प्रवासाची आवड आहे. सर्व प्रकारचे संगीत मी ऐकतो. पण ते सुसह्य असले तरच. चित्रपटाचेसुधा असेच आहे.
अजुन एक नविन प्रकार तुम्हाला इथे पहावयास मिळेल चित्रकविता. अनेक नामवंत कवी-कवयित्रिंच्या कविता इथे चित्र स्वरूपात वाचावयास मिळतील.  
माझी मित्रपरिवारत अनेक नामवंत, दिग्गज कलाकार, कवी, कवयित्री, चित्रकार, सिने कलाकार, PHOTOGRAPHERS सामिल झाले आहेत. आणि ते माझे आता खुप जवलचे मित्र  पण झाले आहेत..खुप शिकायला मिलते ह्या लोकांकडून.  आत्मस्तुति पुरे आता. मैत्री करूं तर पहा. नाही तर पर्याय आहेच आपल्याकडे.